धारुरच्या डोंगरावर सीताफळाच्या बियांचे रोपण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST2021-07-13T04:07:52+5:302021-07-13T04:07:52+5:30
धारूर : सीताफळाच्या बियांची लागवड करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व कृषी अभ्यासक डॉ. बी. के. ठोंबरे यांच्या आवाहनाला ...

धारुरच्या डोंगरावर सीताफळाच्या बियांचे रोपण - A
धारूर : सीताफळाच्या बियांची लागवड करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व कृषी अभ्यासक डॉ. बी. के. ठोंबरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कायाकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने अंबाचंडी रस्त्यावर श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. डोंगर परिसरात सीताफळ बियांची लागवड करण्यात आली. धारुर तालुका सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून वृक्षतोडीमुळे सीताफळाच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. सीताफळ लागवड किंवा सीताफळ बियांची लागवड होत नसल्याने, परिसरातील निसर्गप्रेमींनी पुढाकार घेण्यासाठी डॉ. बी. के . ठोंबरे यांनी आवाहन केले होते. धारुर परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये, शेतात बांधावर व मोकळ्या जागेत बिया टाकून सीताफळांच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची संकल्पना मांडत, डॉ. ठोंबरे यांनी सीताफळ बिया उपलब्ध करत, स्वत: सीताफळ बियांची लागवड सुुरू केली. त्यांच्या उपक्रमाला शहरातील विविध सामाजिक संघटना, गणेश मंडळ व युवकांनी चांगला प्रतिसाद देत, सीताफळ बियांची लागवड करण्यास प्रारंभ केला. शहरातील प्रसिद्ध उद्योजक उदयसिंह दिख्खत, सराफ व्यापारी महेश चिद्रवार, अमोल थोरात यांच्या उपस्थितीत अंबाचंडी रस्त्यावर श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तर डोंगर परिसरात सीताफळांच्या बियांचे रोपण करण्यात आले. या मोहिमेत शाकेर सय्यद , कायाकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, सचिव विश्वानंद तोष्णिवाल, ज्ञानेश्वर शिंदे, अलंकार कामाजी, कैलास बोरगावकर, जलदूत विजय शिनगारे, अथर्व कामाजी आदींसह तरुण व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
110721\2919img-20210711-wa0051.jpg~110721\2919img-20210711-wa0071.jpg
धारूर परीसरातील उजाड डोंगरावर सिताफळ बिया लावताना~धारूर परीसरातील डोंगरावर सिताफळाचे बिया लावताना