अर्धपिंपरीत १०० झाडांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:49+5:302021-07-07T04:41:49+5:30

तालुक्यातील अर्धापिंपरी येथील महेश देशपांडे याच्या मार्गदर्शनाखाली व वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गावातील पर्यावरण संतुलित रहावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात ...

Planting of 100 trees in half a pipe | अर्धपिंपरीत १०० झाडांचे रोपण

अर्धपिंपरीत १०० झाडांचे रोपण

तालुक्यातील अर्धापिंपरी येथील महेश देशपांडे याच्या मार्गदर्शनाखाली व वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गावातील पर्यावरण संतुलित रहावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील हनुमान मंदिर परिसरात रविवारी सकाळी ११ वाजता जवळपास १०० झाडे लावण्यात आली. यात वड, पिंपळ, गुलमोहर, लिंब, करंज, जांभूळ या झाडांचा समावेश आहे. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे महेश देशपांडे, संघर्ष धान्य बँकेचे शिवाजी झेंडेकर, सुभाष काळे, धर्मराज करपे, आधार माणुसकी ग्रुपचे रंजित पवार, प्रवीण देशपांडे, शेख सलमान, किशोर वेदपाठक, बंगाली पिंपळाचे सरपंच तुकाराम तळदकर, ग्रामसेवक काकडे, सुरेश नवले, हरिभाऊ शेलुटे, विष्णू खेडकर, विलास शिंदे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा झाड भेट देऊन सत्कार करण्यात आला.

050721\sakharam shinde_img-20210705-wa0019_14.jpg

Web Title: Planting of 100 trees in half a pipe