नियोजित वधूचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:46 PM2019-11-30T23:46:54+5:302019-11-30T23:48:05+5:30

स्वत:शी लग्न जमलेल्या मुलीचा खून केल्याप्रकरणी प्रशांत गणेश खराडे (२६, रा. सावरगाव, ता. माजलगाव) यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली.

Planned bride murder; Life sentence for the accused | नियोजित वधूचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

नियोजित वधूचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Next
ठळक मुद्देपुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न। माजलगाव तालुक्यातील प्रकरण

बीड : स्वत:शी लग्न जमलेल्या मुलीचा खून केल्याप्रकरणी प्रशांत गणेश खराडे (२६, रा. सावरगाव, ता. माजलगाव) यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली.
९ जानेवारी २०१७ रोजी मयत मुलगी नामे सोनाली उर्फ रिंकू मोतीराम नाईकनवरे (वय १६) ही डोके दुखत असल्याने माजलगावातील एका नेत्रालयात आली होती. दुपारी २ च्या सुमारास प्रशांत तेथे आला. नंतर त्याने सोनालीला धारुर घाटातील बन्सीवाडी शिवारातील ओढ्याच्या कडेला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून तसेच दगडाने गळ्यावर मारुन खून केला. तिचा मोबाईल बंद करुन सिदफणा नदीच्या पुलाखाली पात्रात फेकून दिले. गुन्हा करताना प्रशांतच्या सदऱ्यावर मयत मुलीच्या रक्ताचे डाग पडल्याने ते पाण्याने धुवून सदरा लपवून ठेवला. सदर मुलीचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करुन तिचा खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने अपहरण, खून तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासले. मोतीराम नाईकनवरे, पांडुरंग कुलकर्णी, प्रकाश नाईनवरे, नितीन पांचाळ, अनिल चुंबळे, पद्मिनबाई नाईकनवरे, डॉ. वाय. व्ही भगत, पोलीस उपनिरीक्षक विकास दत्ता दांडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. हरिबालाजी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात खून केल्याप्रकरणी जन्मठेप तसेच इतर कलमांतर्गत सात तसेच पाच वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. सरकार पक्षातर्फे माजलगाव येथील वरिष्ठ सहायक वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. रणजित ए. वागमारे, अ‍ॅड. बी. आर. डक तसेच पैरवी अधिकारी जालिंदर एस. वाव्हळकर यांनी सहकार्य केले.
आत्महत्येचा केला होता बनाव
प्रशांत याची लग्न करण्याची इच्छा नसल्याने आणि लग्न न केल्यास गावात आपण राहू शकणार नाही त्यामुळे खून केला. सोनीलाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, वैद्यकीय अहवालात गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Planned bride murder; Life sentence for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.