pickup truck and moped's accident face-to-face; Moped rider women killed on site | आष्टीत पिकअप- मोपेडची समोरासमोर धडक; मोपेडस्वार महिला जागीच ठार
आष्टीत पिकअप- मोपेडची समोरासमोर धडक; मोपेडस्वार महिला जागीच ठार

आष्टी : शहरातील ईदगाह मैदानावर पिकअप व मोपेडची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोपेडस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. १७ ) सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान घडली. सोनाली सापते (वय ४०) या जागीच ठार झाल्या. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गजबजलेल्या ईदगाह मैदानावर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता पिकअप ( क्रमांक एम.एच.४२ बी ४८४६ ) व एका मोपेडची समोरासमोर धडक झाली. यात मोपेडस्वार महिला सोनाली सापते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्राव झाल्याने सापते यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक भाऊसाहेब बाबुराव धोंडे हा स्वतःहून आष्टी पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास उपनिरीक्षक साईप्रसाद पवार,पोलीस कॉन्स्टेबल बन्सी जायभये, आगलावे, तवले करत आहेत.

Web Title: pickup truck and moped's accident face-to-face; Moped rider women killed on site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.