बीडमध्ये पिकअप चालकास १८ महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:56 IST2018-04-26T00:56:19+5:302018-04-26T00:56:19+5:30
भरधाव पिकअपच्या धडकेने एकाच्या मृत्यू प्रकरणात पिकअप चालकाला १८ महिने कारावास तसेच तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आष्टी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन.एन.धेंड यांनी मंगळवारी सुनावली.

बीडमध्ये पिकअप चालकास १८ महिने कारावास
बीड : भरधाव पिकअपच्या धडकेने एकाच्या मृत्यू प्रकरणात पिकअप चालकाला १८ महिने कारावास तसेच तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आष्टी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन.एन.धेंड यांनी मंगळवारी सुनावली.
५ फेब्रुवारी २०१२ रोजी आष्टी येथील एका हॉटेलसमोर अशोक हंबर्डे व बाबासाहेब हंबर्डे थांबले होते. त्यावेळी अचानक समोरुन आलेल्या पिकअपने जोराची धडक दिली. त्यानंतर चालकाने वाहन तेथेच सोडून पळ काढला. या अपघातात गंभीर जखमी झालेले बाबासाहेब हंबर्डे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ओटी पोलीस ठाण्यात अशोक हंबर्डे यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार पिकअप चालक सुनील सानप याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक के. डी. वळेकर यांनी तेला. या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी साक्षीदारांचे जबाब नांदविले. घयनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मयताचा शवविच्छेदन अहवाल हस्तगत केला. या गुन्ह्यात जप्ती पंचनामा केला होता. यातील आरोपीला अटक व तपासानंतर आष्टी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सुनावणीनंतर सदर गुन्ह्यात सबळ पुरावा व साक्ष ग्राह्य धरून पिकअप चालक सुनील सानप यास भारतीय दंड संहिता कलम २७९ नुसार ३ महिने कारावास व १००० रुपये दंड , कलम ३०४ अ नुसार १ वर्ष कारावास व २००० रुपये दंड अशी शिक्षा न्या. एन. एन. धेंड. यांनी सुनावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षाचे वकील म्हणून पी. यू. माने यांनी कामकाज पाहिले.
या प्रकरणातील साक्षीदरांच्या बाबतीत उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता. तपासी अधिकारी के. डी. वळेकर, पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली व न्यायालयीन पैरवी अधिकारी सापते , सरकारी वकील पी. यू. माने यांनी साक्षीदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. आष्टी पोलिसांच्या सूक्ष्म व योग्य तपासामुळे या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली.