संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल; परळी वगळता बीड जिल्ह्यात कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:42 IST2025-03-04T12:42:00+5:302025-03-04T12:42:26+5:30
Beed Bandh: सकाळी बीड शहरातून सकाळी बंदचे आवाहन करीत दुचाकी रॅली काढण्यात आली.

संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल; परळी वगळता बीड जिल्ह्यात कडकडीत बंद
Beed Bandh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या निर्दयी कृत्याच्या निषेधार्थ मंगळवारी बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. दरम्यान परळी वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळी बीड शहरातून सकाळी बंदचे आवाहन करीत दुचाकी रॅली काढण्यात आली. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे अशा घोषणा रॅलीदरम्यान देण्यात आल्या. तर पोलिस संरक्षणात रापमच्या बस सोडण्यात येत होत्या. बीड, घाटनांदूर, अंबाजाेगाई, दिंद्रुड, धारूर, वडवणीसह सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.
#Beed | मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बीड जिल्हा बंदची हाक.
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 4, 2025
♦️ बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात.#santoshdeshmukhcase#BeedCrime@InfoBeed@BEEDPOLICEpic.twitter.com/OzRumjNX9w
केजमध्ये टायर, बॅनर जाळले
केजच्या धारुर चौकात टायर जाळण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांचे फोटो असलेले बॅनर संतप्त जमावाने जाळले.
परळी शहरात शहरात आतापर्यंत शांतता आहे, बंदसाठी आणखी कोणी फिरले नाही. बाजारपेठेतील दुकाने चालू आहेत.