फोटो एक, नावे दोन, ओळखा ‘हे’ कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:58 IST2019-08-19T00:57:46+5:302019-08-19T00:58:36+5:30
जिल्हा रुग्णालय परिसरातील वडाच्या झाडाखाली एका ७० ते ७५ वर्षीय इसमाचा मृतदेह रविवारी आढळून आला.

फोटो एक, नावे दोन, ओळखा ‘हे’ कोण ?
बीड : येथील जिल्हा रुग्णालय परिसरातील वडाच्या झाडाखाली एका ७० ते ७५ वर्षीय इसमाचा मृतदेह रविवारी आढळून आला. उपचारासाठी ते एकटेच आले होते. त्यांच्याकडे दोन वेगवेगळी ओळखपत्रे मिळाल्यामुळे ओळख पटू शकली नव्हती. आधार कार्डवर भाऊसाहेब माणिकराव फलके (रा. राजा टाकळी, कुंभारी पिंपळगाव ता. घनसावंगी. जि.जालना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर एका दुसऱ्या ओळखपत्रावर तुकाराम विठ्ठलराव गिरी असे नाव आहे. दोन्ही कार्डवर फोटो मात्र सारखाच आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचे काम सुरु होते.