सिरसाळा बाजारपेठेत मृतावस्थेत आढळला मोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:18 IST2018-07-03T01:17:19+5:302018-07-03T01:18:08+5:30

Peacock found in a siren market in the dead | सिरसाळा बाजारपेठेत मृतावस्थेत आढळला मोर

सिरसाळा बाजारपेठेत मृतावस्थेत आढळला मोर

सिरसाळा : येथील बाजारपेठेत दुकानासमोर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. हा मोर गावात आला की आणला? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.

किराणा मालाचे व्यावसायिक अशोक गलांडे सोमवारी सकाळी आपले दुकान उघडण्यास आले तेंव्हा दुकानासमोर पंख निदर्शनास आले. हे पाहून त्यांनी बाजूच्या दुकानाकडे बघितले तेंव्हा हा मोर मृतावस्थेत आढळून आला. गलांडे यांनी सिरसाळा पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहेकॉ लांडगे, पवार यांनी येऊन पाहणी केली. मृत मोर हा वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला.

वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृत मोराचे सिरसाळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन केले. हा मोर मारला की मेला हे समजले नाही. हा मोर बाजारपेठेत कसा काय आला ? की कोणी आणून मारु न टाकला? अशा प्रकारच्या चर्चेला सिरसाळ्यात दिवसभर उधाण आले होते.

Web Title: Peacock found in a siren market in the dead