परळीत पोलिसांनी १२ लाखाचा अवैध गुटखा पकडला; दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:19 IST2018-09-07T17:16:59+5:302018-09-07T17:19:04+5:30
मुंबईवरून अहमदपूरकडे निघालेल्या एका टेम्पोतील अवैध गुटखा तालुक्यातील धर्मापूरीजवळ परळी ग्रामीण पोलिसांनी पकडला.

परळीत पोलिसांनी १२ लाखाचा अवैध गुटखा पकडला; दोघे ताब्यात
परळी (बीड ) : मुंबईवरून अहमदपूरकडे निघालेल्या एका टेम्पोतील १२ लाख १४ हजार रुपयांचा गुटखा तालुक्यातील धर्मापूरीजवळ परळी ग्रामीण पोलिसांनी पकडला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी विजयकुमार कांता प्रसाद सरोज व मुकेश काशी गिरी (रा.कात्राबाजार, बदोली, उत्तर प्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अन्न औषध प्रशासन खात्याच्या ताब्यात दिले आहे.
तालुक्यातील धर्मापूरी जवळ गस्तीवर असलेल्या परळी ग्रामीण पोलिसांनी एका टेम्पोची (एमएच ०४ एचएस १४४४ ) गुरुवारी रात्री तपासणी केली. यावेळी हा टेम्पो मुंबईवरून अहमदपूरकडे निघाल्याचे चालकाने सांगितले. वाहनाची अधिक तपासणी केली असता त्यात १२ लाख १४ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा, टेम्पो जप्त केला असून विजयकुमार कांता प्रसाद सरोज व मुकेश काशी गिरी या दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यातील दोघांना पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविले आहे.