लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनाच्या विरोधात सोमवारी सायंकाळी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण (पॉवर हाउस) कार्यालयावर कंदिल मोर्चा काढण्यात आला.वीज भारनियमन रद्द झाले पाहिजे अशा घोषणा देत हातात कंदिल घेऊन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बाळासाहेब देशमुख, चंदूलाल बियाणी, प्रा. मधुकर आघाव, पिंटू मुंडे, भावड्या कराड, संजय आघाव, चेतन सौंदळे, अनंत इंगळे, गोपाळ आंधळे, रज्जाक कच्छी, चित्रा देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.दरम्यान, या मोर्चामुळे शहरातील नागरिकांना सुविधांच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. मोर्चाने शहर दणाणून गेले होते.सरकारला जाब विचारावाच लागेलपरळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी शहर भारनियमन मुक्त ठेवणे आवश्यक आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार उर्जामंत्री असताना विजनिर्मिती केंद्र असलेली शहरे भारनियमन मुक्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या सरकारने शहराला अंध:कारात ढकलले आहे. यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणाºया सरकारला जाब विचारावाच लागेल, असे धनंजय मुंडे म्हणाले.
भारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:51 IST
अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनाच्या विरोधात सोमवारी सायंकाळी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण (पॉवर हाउस) कार्यालयावर कंदिल मोर्चा काढण्यात आला.
भारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा
ठळक मुद्देधनंजय मुंडे : अन्यायकारक भारनियमन बंद करण्याची मागणी