परळीत ट्रक चोरीची फिर्याद देणाराच निघाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:30 IST2018-09-14T17:25:30+5:302018-09-14T17:30:31+5:30
एका ट्रक मालकाने आपली ट्रक परळी अंबाजोगाई रस्त्यावरुन चोरीस गेल्याची तक्रार दिली होती

परळीत ट्रक चोरीची फिर्याद देणाराच निघाला आरोपी
परळी (बीड ) : तालुक्यातील पिंप्री ब्रुद्रक येथील एका ट्रक मालकाने आपली ट्रक परळी अंबाजोगाई रस्त्यावरुन चोरीस गेल्याची तक्रार दिली पोलिस ठाण्यात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी छडा लावत तक्रारदारच आरोपी असल्याचे उघडीस आणले.
या बाबत अधिक माहिती अशी की, १ ऑगस्ट रोजी ट्रक मालक बालासाहेब बाबुराव चव्हाण ( रा.पिंप्री बु्रद्रक, ता.परळी वैजनाथ) याने आपली ट्रक ( एमएच ४४ - ५९३३ ) परळी- अंबाजोगाई रोडवरून चोरीस गेल्याची तक्रार दिली.याचा तपास करत पोलिसांनी ही ट्रक चव्हाण याने शेख मियाँ शेख रज्जाक या गॅरेज चालकास विकल्याचे उघडकीस आले. तसेच शेख मियां यानेसुद्धा ही ट्रक परत एकदा विक्री केली. या सर्व प्रकारचा पोलीसांनी छडा लावत चव्हाण आणि शेख मियां यास ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर व अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास शेळके, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, पोलिस जमादार नरहारी नागरगोजे, सखाराम पवार, डी.बी.चे जमादार बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड, जमादार गोविंद बडे, सुंदर केंद्रे यांनी केली.