पंकजा, तुम्हारे नेतृत्व में बहोत अच्छा काम कर रहा है, ग्रामीण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:36 IST2018-10-20T00:35:38+5:302018-10-20T00:36:22+5:30

‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

Pankaja, is working very well under your leadership, rural development | पंकजा, तुम्हारे नेतृत्व में बहोत अच्छा काम कर रहा है, ग्रामीण विकास

पंकजा, तुम्हारे नेतृत्व में बहोत अच्छा काम कर रहा है, ग्रामीण विकास

ठळक मुद्देशिर्डी येथील कार्यक्रम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली शाबासकी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी शिर्र्डी येथे आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेतील अडीच लाख पात्र लाभार्थ्यांना ई गृहप्रवेश ताबा देण्यात आला तर वीस लाभार्थ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते घराच्या चाव्या देण्यात आल्या. यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन ही योजना प्रभावीपणे राबविली होती. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने साईबाबा मंदिर परिसरातील लेंडीबागेत हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण संपवून व्यासपीठावरून खाली उतरत असतानाचा हा प्रसंग आहे. ग्रामविकास विभागाने कार्यक्रमाचे केलेले उत्कृष्ट नियोजन पाहून ते खूश झाले, पंतप्रधान मोदी यांनी पंकजा मुंडे यांना बोलावून घेतले आणि ‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग राज्य में बहोत अच्छा काम कर रहा है, आगे बढो’ अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी शिर्र्डी विमानतळावर पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: Pankaja, is working very well under your leadership, rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.