शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पंकजा मुंडे जरांगेंना म्हणाल्या, ‘ओबीसीत आपले स्वागत’; अशी होती जरांगेंची प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:44 IST

पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला

माजलगाव (जि. बीड) : शहरात एका विवाह सोहळ्यात माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील एकत्र आले हाेते. पंकजा यांनी जरांगे यांचे ‘आपला ओबीसीत समावेश झाला असून तुमचे स्वागत आहे,’ अशा पद्धतीने स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

माजलगाव शहरात रविवारी संध्याकाळी विवाह सोहळा पार पडला. यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी विविध पक्षांचे नेते आले होते. यावेळी मनोज जरांगे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रथमच पंकजा मुंडे आणि जरांगे समोरासमोर आले. यामुळे त्यांच्यात कोणता संवाद होईल अशी सर्वांना उत्सुकता होती. अनेक मंत्री छगन भुजबळ वगळता इतर ओबीसी नेत्यांनी कुणबी मराठा आरक्षणावरील नव्या अध्यदेशावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे देखील राज्यातील मातब्बर ओबीसी नेत्या आहेत. यामुळे मुंडे आणि जरांगे या दोन नेत्यांची पहिली भेट कशी होणार, दोघांत काय संवाद होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. 

दरम्यान, लग्न सोहळ्यात एकमेकांच्या बाजूला सोफ्यावर माजी मंत्री राजेश टोपे, मराठा नेते मनोज जरांगे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिघेही संवादात रमले होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मनोज जरांगे यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच होत आहे. त्यांचा शनिवारी ओबीसीमध्ये समावेश झाला असून त्यांचे ओबीसीत स्वागत आहे.’ पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर जरांगे यांनीदेखील स्मितहास्य करत दाद दिली.

सकारात्मक मार्ग मिळाला आहेमाजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यादेश निघताच सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या , गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट आणू पाहताय त्या प्रवृत्तींना आपल्याला आळा घातला पाहिजे. यात संयमाची भूमिका घेण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न केला. सरकारने अध्यादेश काढलाय. सर्वसंमतीने अध्यादेश निघालेला असावा. या अध्यादेशात मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी मांडल्या होत्या. त्यातील एका मागणीवर महत्त्वाचा प्रकाश टाकला जाईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावे. यात सगेसोयरे यांची व्याख्या केली आहे. आजही लाखो कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी सकारात्मक मार्ग मिळाला आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा हे साध्य करायला मनोज जरांगे यशस्वी झालेत हे म्हणायला हरकत नाही असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड