Pankaja Munde: पंकजा मुंडेच्या भाषणानंतर पोलीस-कार्यक्रेत्यांमध्ये बाचाबाची, नेते व्यासपीठावरच अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 15:18 IST2022-10-05T15:17:57+5:302022-10-05T15:18:14+5:30
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी अनेक नेते उपस्थित होते.

Pankaja Munde: पंकजा मुंडेच्या भाषणानंतर पोलीस-कार्यक्रेत्यांमध्ये बाचाबाची, नेते व्यासपीठावरच अडकले
बीड- आज विजयादशमी/दसऱ्याचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, महाराष्ट्रात आज दसरा मेळाव्यांची धूम पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा सावरगावात मेळावा झाला. मेळाव्यात पंकजा मुंडेंनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, पंकजांच्या भाषणानंतर मोठा गोंधळ झाला.
'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे'
जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सावरगाव घाट गावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पंकाजा मुडेंसह, खासदार प्रितम मुंडे, यशश्री मुंडे, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडेंच्या आधी जानकर आणि प्रितम यांची भाषणे झाली. दरम्यान, पंकजा मुंडेच्या भाषणानंतर मेळाव्यात मोठा गोंधळ झाला.
मी थकणार नाही, मी झुकणार नाही; संघर्ष कुणाला चुकलेला नाही- पंकजा मुंडे
पंकजांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे तिथे एक गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते. यावेळी व्यासपीठावरुन पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, दोन पोलिसांमुळे गोंधळ उडाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समर्थकांनी केली. या सर्व गोंधळात तीन तोळ्यांचे लॉकेट आणि अनेकांची पाकिटे चोरीला गेली आहेत.