दरोडा टाकण्याचा प्लान करुन गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या तीन तरुणांना श्हरातील भक्ती कन्स्ट्रक्शन्स परिसरात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केले. ...
जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या २५१ शिक्षकांचे शासन नियमानुसार समायोजन करुन त्यांना पदस्थापना देण्यात आली. शनिवारी तहसील कार्यालयात पारदर्शी पध्दतीने ही प्रक्रिया पार पडल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ...
शहरातील जालना रोडवरील गोदाम फोडून सिगारेट चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीस गेलेल्या ६ लाख ९० हजार रुपयांच्या सिगारेट तर जप्त केल्या त्याचबरोबर आणखी जवळपास २ लाख १० हजारांचा असा दहा लाखांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. ...
सलग दुस-या दिवशी अंबाजोगाई लगतच्या अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बुट्टेनाथ दरी येथे अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवार (दि. १३ जुलै) रोजी सकाळी सात ते साडेअकराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षक ...
गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ...
विधवा घरमालक महिलेस लग्नाचे आमिष दाखवून भाडेकरूने अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भाडेकरूवर अंबाजोगाई शहर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. ...
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवारी अचानक भेट देत जिल्ह्यातील विविध कामांची पाहणी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व टँकरला बसवलेली जीपीआरएस सिस्टिम याविषयी माहिती दिली. ...