लग्नाचे आमिष दाखवून विधवा प्राध्यापिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:05 AM2019-07-13T00:05:58+5:302019-07-13T00:06:26+5:30

विधवा घरमालक महिलेस लग्नाचे आमिष दाखवून भाडेकरूने अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भाडेकरूवर अंबाजोगाई शहर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.

Atrocities against widow professors by showing loyalty to marriage | लग्नाचे आमिष दाखवून विधवा प्राध्यापिकेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून विधवा प्राध्यापिकेवर अत्याचार

Next

अंबाजोगाई : विधवा घरमालक महिलेस लग्नाचे आमिष दाखवून भाडेकरूने अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून भाडेकरूवर अंबाजोगाई शहर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.
राम धर्मराज जोगदंड (रा. भाटुंबा, ता. केज) असे आरोपीचे नाव आहे. भाटुंब्याचा माजी सरपंच असलेला राम गतवर्षी आॅक्टोबरमध्ये पीडितेच्या घरी किरायाने राहण्यासाठी आला. पीडित महिला एका महाविद्यालयात प्राध्यापिका असून विधवा आहे. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी असतो. पहिल्याच महिन्याचे भाडे थकल्याने पीडितेने पैशाची मागणी केली असता पत्नीच्या आजारपणाचे कारण पुढे करून रामने भाडे देण्याचे टाळले. त्यानंतरही दर महिन्याचे भाडे थकित ठेवले. दरम्यानच्या काळात रामने पीडितेशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यापासून अनेकदा अत्याचार केला. पत्नीच्या उपचारासाठी म्हणून तिच्याकडून ५० हजार रुपये हातउसने देखील घेतले. त्यानंतर पीडितेने आठ महिन्याचे भाडे आणि उसने दिलेले ५० हजार रुपये वापस मागितले असता रामने उद्धट वागणूक सुरु केली. त्यामुळे पीडितेने त्याला घर सोडण्यास सांगितले. ६ जुलै रोजी रामने मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन तिला अश्लील शिवीगाळ केली. पीडितेने पोलिसात जाण्याची धमकी देताच पोलीस व राजकारणी माझ्या खिशात आहेत अशी वल्गना केली. त्यानंतर तिच्या मुलाला आणि आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याने पुन्हा अत्याचार केला. गुरुवारी पीडिता महाविद्यालयात गेली असता राम तिथेही पोचला आणि तिला गाठून महाविद्यालयाबाहेर येण्याची वेळ विचारली व प्रवेशद्वारावर वाट पाहत थांबला. आता हा आपल्याला मारून टाकणार अशी शंका आल्याने पीडितेने शहर ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी धाव घेत रामला बेड्या ठोकल्या. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला.

Web Title: Atrocities against widow professors by showing loyalty to marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.