अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी हे पथक पाहणी करणार आहे. व्ही. थिरु प्पुगाझ हे या पथकाचे प्रमुख असून डॉ. के. मनोहरन हे सदस्य आहेत. ...
परळी मतदार संघातील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वाढलेल्या प्राबल्यामुळे पंकजा यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हेही तेवढंच खरं आहे. ...
तालुक्यामध्ये सध्या वीज महामंडळाने व थकबाकीचे सक्ती केली असून गुरुवारी दिवसभर जनमित्राद्वारे थकबाकीची वसुली केली जात आहे. जवळपास ८६६ ग्राहकांकडे ३.५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ...
तालुक्यातील घागरवाडा येथे शहीद परमेश्वर बालासाहेब जाधवर (२६) यांच्या पार्थिवावर गुरूवारी सांयकाळी पाच वाजता साश्रुनयनांनी शेकडोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीसाठी एक लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सावात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात आ ...
खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही. ...
जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी १४४ कोटी १८ लाख ८३ हजार रुपयांचा मदत निधी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावर प्राप्त झाला आहे. हा निधी तात्काळ शेतक-यापर्यंत पोहचावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर पाठवला आहे. ...