Paddle pistol | गावठी पिस्टल बाळगणारा गजाआड
गावठी पिस्टल बाळगणारा गजाआड

कडा : गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरूणास आष्टी पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई सिंदेवाडी येथे करण्यात आली. अमोल दरेकर (२२) असे या आरोपीचे नाव आहे. अमोल दरेकर हा आपल्या शेतामध्ये गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा लावून गुरूवारी दुपारच्या सुमारास त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडील पिस्टलही पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गोडसे करीत आहेत.


Web Title: Paddle pistol
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.