शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आमच्या नेत्या पंकजा मुंडे; गोपीनाथ गडावरील उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 3:41 PM

आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गड उभारला. गडावरून प्रेरणा उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात करत आहोत.

परळी  : प्रेरणा, उर्जा असे गोपीनाथ गडाचे ब्रीद आहे. याठिकाणी येणारा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी येथून प्रेरणा घेऊन जातो. यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या मराठवाड्यातील जन आशीर्वाद यात्रेला येथून सुरुवात करीत आहोत. आमच्या नेत्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ( Pankaja Munde ) आहेत. म्हणून त्यांच्या हस्ते झेंडा दाखवून यात्रेस सुरुवात केल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhgwat Karad ) यांनी गोपीनाथ गड ( Gopinath Gad ) येथे केली. ( Our leader Pankaja Munde; The Jan Ashirwad Yatra started with energy from Gopinath Gad) 

गोपीनाथ गड येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड पत्रकारांना बोलताना  म्हणाले, आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गड उभारला. गडावरून प्रेरणा उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात करत आहोत. गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्यातांड्यावर पोहचवला. यामुळेच आज आम्ही या ठिकाणी पोहचू शकलो, असेही कराड यावेळी म्हणाले. दरम्यान, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर डॉ. कराड यांनी सपत्नीक वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांचे दर्शन घेतले. 

गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्या-तांड्यावर नेला म्हणून आज आम्ही इथे आहोत - डॉ. भागवत कराड

पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या डॉ. कराड यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.  प्रितम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्यामुळे नाराज असलेल्या मुंडे समर्थकांनी भागवत कराड परळीत दाखल घोषणाबाजी सुरू केली. या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है...', अशा स्वरुपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. यानंतर भागवत कराड यांच्यासमोरच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहे का? इथे काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का? हे वागणं मला चालणार नाही, असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका, अशा शब्दात पंकजा यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपा