आमच्या नेत्या पंकजा मुंडे; गोपीनाथ गडावरील उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 03:41 PM2021-08-16T15:41:17+5:302021-08-16T15:46:12+5:30

आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गड उभारला. गडावरून प्रेरणा उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात करत आहोत.

Our leader Pankaja Munde; The Jan Ashirwad Yatra started with energy from Gopinath Gad | आमच्या नेत्या पंकजा मुंडे; गोपीनाथ गडावरील उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात 

आमच्या नेत्या पंकजा मुंडे; गोपीनाथ गडावरील उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात 

googlenewsNext

परळी  : प्रेरणा, उर्जा असे गोपीनाथ गडाचे ब्रीद आहे. याठिकाणी येणारा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी येथून प्रेरणा घेऊन जातो. यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या मराठवाड्यातील जन आशीर्वाद यात्रेला येथून सुरुवात करीत आहोत. आमच्या नेत्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ( Pankaja Munde ) आहेत. म्हणून त्यांच्या हस्ते झेंडा दाखवून यात्रेस सुरुवात केल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhgwat Karad ) यांनी गोपीनाथ गड ( Gopinath Gad ) येथे केली. ( Our leader Pankaja Munde; The Jan Ashirwad Yatra started with energy from Gopinath Gad) 

गोपीनाथ गड येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड पत्रकारांना बोलताना  म्हणाले, आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गड उभारला. गडावरून प्रेरणा उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात करत आहोत. गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्यातांड्यावर पोहचवला. यामुळेच आज आम्ही या ठिकाणी पोहचू शकलो, असेही कराड यावेळी म्हणाले. दरम्यान, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रीतम मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर डॉ. कराड यांनी सपत्नीक वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांचे दर्शन घेतले. 

गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्या-तांड्यावर नेला म्हणून आज आम्ही इथे आहोत - डॉ. भागवत कराड

पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या 
डॉ. कराड यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.  प्रितम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्यामुळे नाराज असलेल्या मुंडे समर्थकांनी भागवत कराड परळीत दाखल घोषणाबाजी सुरू केली. या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है...', अशा स्वरुपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. यानंतर भागवत कराड यांच्यासमोरच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहे का? इथे काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का? हे वागणं मला चालणार नाही, असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका, अशा शब्दात पंकजा यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला.

Web Title: Our leader Pankaja Munde; The Jan Ashirwad Yatra started with energy from Gopinath Gad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.