कृषी विज्ञान केंद्र येथे ऑनलाईन महिला दिन साजरा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:32+5:302021-03-10T04:33:32+5:30

औरंगाबाद येथून सामाजिक कार्यकर्त्या संध्या कुलकर्णी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कृष्णा कर्डिले यांनी जागतिक महिला दिनाचे प्रास्ताविक करताना जागतिक ...

Online Women's Day Celebration at Krishi Vigyan Kendra - A | कृषी विज्ञान केंद्र येथे ऑनलाईन महिला दिन साजरा - A

कृषी विज्ञान केंद्र येथे ऑनलाईन महिला दिन साजरा - A

औरंगाबाद येथून सामाजिक कार्यकर्त्या संध्या कुलकर्णी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

कृष्णा कर्डिले यांनी जागतिक महिला दिनाचे प्रास्ताविक करताना जागतिक महिला दिनाचा इतिहास विषद करून सांगितला. रोहिणी भरड यांनी प्रत्येक महिलेने स्वतःच्या व कुटुंबाच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगितले. महिलांनी फळपीक लागवडीवर भर द्यावा. फळपिकामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक मिळकतीची शाश्वती अधिक वाढते. शेवगा, आवळा व पेरू या फळपिकांना प्रक्रिया उद्योगातही मोठी मागणी आहे, असे नरेंद्र जोशी यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यामध्ये शेवगा लागवड दरवर्षी वाढत आहे. शेवगा पानावर प्रक्रिया करून तयार पावडरला बाजारात मोठी मागणी आहे. महिला स्वावलंबी झाल्या तर त्यांना समानतेचा अधिकार मिळेल. आपल्याकडील नावीन्यपूर्ण संकल्पनांना मदत करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र नेहमी तयार आहे, असे अध्यक्षीय समारोप करताना डॉ. शर्मा यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृष्णा कर्डिले यांनी केले.

===Photopath===

090321\09bed_22_09032021_14.jpg

===Caption===

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे ऑनलाईन पद्धतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Web Title: Online Women's Day Celebration at Krishi Vigyan Kendra - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.