उसनवारी करून कांदा पिकवला; भाव पडल्याने शेतकऱ्याने नैराश्यात जीव संपवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:16 IST2023-05-23T18:16:23+5:302023-05-23T18:16:45+5:30
शेतकऱ्याने दोन दिवस दिली मृत्यूशी झुंज, उपचारादरम्यान झाला मृत्यू

उसनवारी करून कांदा पिकवला; भाव पडल्याने शेतकऱ्याने नैराश्यात जीव संपवला
- नितीन कांबळे
कडा - उसनवारी करून कांदा पिक घेतलं पण त्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतीतुन आर्थिक उन्नती झाली नाही.लोकाचं कर्ज डोक्यावर वाढत गेलं आलेल्या नैराश्यातून एका शेतकर्याने रविवारी शेतात विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अंकुश बाबुराव एकशिंगे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी अंकुश बाबुराव एकशिंगे ( ४४ ) यांनी कांदा लागवड केली होती. काढणी केलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने लोकांचे घेतलेले उसनवारीचे पैसे देखील देण्यासाठी हातात आले नसल्याने याच विवंचनेत असताना रविवारी २१ रोजी सायंकाळी शेतात विषारी औषध प्राशन केले. लोकांच्या लक्षात येताच त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले . मात्र उपचारा दरम्यान मंगळवारी पहाटे त्याचे निधन झाले.त्यांच्यावर दुपारी चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे