मॉर्निंग वॉकला गेलेल्या एकास टेम्पोने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:43 IST2019-05-30T00:42:42+5:302019-05-30T00:43:03+5:30
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दिलीप भीमराव चव्हाण (४५ रा.उदंडवडगाव) यांना भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने (के.ए.०२ ए.एफ. ९४८४) जोराची धडक दिली. यामध्ये चव्हाण हे जागीच ठार झाले.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या एकास टेम्पोने चिरडले
बीड : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दिलीप भीमराव चव्हाण (४५ रा.उदंडवडगाव) यांना भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने (के.ए.०२ ए.एफ. ९४८४) जोराची धडक दिली. यामध्ये चव्हाण हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी पहाटे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बंकट स्वामीनगर मोरगाव फाट्याजवळ घडली. घटनास्थळी महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर नवले व त्यांच्या टिमने तात्काळ धाव घेतली. चव्हाण यांना नेकनूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. टेम्पो ताब्यात घेऊन नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केला. उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्यात प्रक्रिया सुरू होती.