क्रेन कोसळून एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:12 IST2019-02-20T00:12:00+5:302019-02-20T00:12:13+5:30

राडी येथे विहिरीतील गाळ काढताना क्रेन कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले

One killed, two injured in crane collapsed | क्रेन कोसळून एक ठार, दोन जखमी

क्रेन कोसळून एक ठार, दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील राडी येथे विहिरीतील गाळ काढताना क्रेन कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राडी येथे गोविंद शंकर वाघे (वय -४०) या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत गाळ काढण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी विहिरीतून क्रेन वर घेण्यात येत होती. त्यावेळी क्र ेनचे ब्रेक निकामी झाले. परिणामी क्रेनची पाटी अचानक विहिरीत कोसळल्याने क्रेनमधून वर येत असलेले गोविंद वाघे हे जागीच ठार झाले.
या दुर्घटनेत दादाराव तुकाराम बनसोडे (वय ५०), परमेश्वर बनसोडे (वय ४५) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: One killed, two injured in crane collapsed