माजलगावजवळ जीप-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:08 IST2020-06-26T22:08:02+5:302020-06-26T22:08:48+5:30

दुचाकीवरील युवक जागीच ठार

One killed on the spot in jeep-bike accident; One serious | माजलगावजवळ जीप-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; एक गंभीर

माजलगावजवळ जीप-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; एक गंभीर

माजलगाव : येथील गेवराई रोडवरील नवीन मोंढ्यासमोर जीप ( एम एच २८-व्ही - ७०८०) व दुचाकीचा (एम एच ४४-ज ४४२) शुक्रवारी ५.३० वाजेदरम्यान समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीस्वार सिद्धेश्वर अंकुश बादाडे हा जागीच ठार झाला,तर राजाराम सखाराम उबाळे हा गंभीर जखमी आहे. 

तालुक्यातील शहाजानपूर येथील रहिवासी सिद्धेश्वर बादाडे-(३०वर्ष) व राजाराम उबाळे (३० वर्ष) हे दोघेही दुचाकीवर माजलगावकडे जात होते. याचवेळी  गेवराई रोडने माजलगावकडे भरधाव वेगाने आलेल्या जीपची नवीन मोंढ्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला गेल्या. अपघातात दुचाकीस्वार सिद्धेश्वर जागीच मृत्यू झाला तर राजाराम गंभीर जखमी झाला. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

Web Title: One killed on the spot in jeep-bike accident; One serious