कार -दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:28 IST2020-02-26T23:28:17+5:302020-02-26T23:28:53+5:30
कार व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला इसम जखमी झाला.

कार -दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
केज / नांदूरघाट : कार व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला इसम जखमी झाला. तालुक्यातील नांदूरघाट येथे २५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
केज तालुक्यातील शिरूरघाट येथील सतीश छंदर घोडके (४५) आणि त्यांचे व्याही केशव विश्वनाथ कुरु ंद (६५, रा. डोंगरेवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) हे २५ रोजी सायंकाळी नांदूरघाट येथून केजकडे दुचाकीने (एमएच १२ सीएस ९६५४) प्रवास करत होते. नांदूरघाट शिवारात माळी यांच्या कोठ्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कारच्या चालकाने (एमएच २३ ई ९४५०) चालवून जोराची धडक दिली. अपघातात सतीश छंदर घोडके हे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले त्यांचे व्याही केशव विश्वनाथ कुरूंद हे गंभीर जखमी झाले. मयताचे नातेवाईक अशोक उत्तम गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मुकुंद ढाकणे हे तपास करीत आहेत.