बीडमध्ये अन्नदात्यांसाठी एक दिवस अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:27 IST2018-03-20T00:27:27+5:302018-03-20T00:27:27+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ साली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटूंबासह आत्महत्या केली होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजही ते कायम असून सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश येत आहे. करपेंच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी एका दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन केले. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बीडमध्ये अन्नदात्यांसाठी एक दिवस अन्नत्याग
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ साली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटूंबासह आत्महत्या केली होती. तेव्हापासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आजही ते कायम असून सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश येत आहे. करपेंच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सोमवारी एका दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन केले. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतक-यांन सरसकट कर्जमुक्त करावे, शेतक-यांला ५ हजार रूपये प्रति महिना पेन्शन योजना लागू करा, हमीभाव अधिक ५० टक्के नफा द्या, दुधाला प्रति लिटर ५० रूपये भाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा यासारख्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या उपोषणात प्रा.सुशीला मोराळे, कालीदास आपेट, माजी सैनिक अशोक येडे, मोहन जाधव, रामप्रसाद गाढे, मोहन गुंड, रामधन जमाले, नामदेव चव्हाण, अंगद मोहिते यांच्यासह शेकडो सहभागी झाले होते.