पत्रकारासह एकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:50+5:302021-07-07T04:41:50+5:30

जुनेद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ५ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका माहितीची ...

One attacked with a journalist | पत्रकारासह एकावर हल्ला

पत्रकारासह एकावर हल्ला

जुनेद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ५ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका माहितीची शहानिशा करण्यासाठी मी व शहानवाज शब्बीर बागवान असे आम्ही दोघेजण खासगी वाहनाने एका ठिकाणी गेलो असता त्याठिकाणी माउली आनंद बाप्ते, सागर ऊर्फ दत्ता आनंद बाप्ते, राम शिवाजी म्हेत्रे, बबलू रमेश सावंत, शुभम आनंद बाप्ते हे पाचजण पत्ते खेळत व दारू पित बसलेले होते. यावेळी राम शिवाजी म्हेत्रे याने लोखंडी रॉड माझ्या डाव्या हातावर फेकून मारला. माउली बाप्ते याने कोयत्याने शहानवाज बागवान यास कपाळावर मारल्याने गंभीर दुखापत केली आहे. सागर ऊर्फ दत्ता आनंद बाप्ते हा पिस्तूल घेऊन माझे मागे लागला, असे फिर्यादीत म्हटले आहे. जर बातमी छापली तर जिवे मारू, अशी धमकी दिली.

Web Title: One attacked with a journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.