आष्टीत गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:07 IST2019-08-20T16:57:09+5:302019-08-20T17:07:50+5:30

एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला

One arrested for selling marijuana in Aashti; 4 lakhs worth of cash seized | आष्टीत गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

आष्टीत गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

कडा (बीड ) : आष्टी तालुक्यातील बोरोडी पारोडी रोडवरील हातोळण फाटा येथे गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या एकास अंभोरा पोलिसांनी सोमवारी (दि.१९ ) रात्री सापळा रचून अटक केली. यावेळी ४ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील बोरोडी पारोडी येथुन जाणार्‍या रोडवरील बोरोडी शिवारातील हातोळण फाट्यावर सोमवारी दोन तरूण विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजाची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सोमवारी रात्री या शिवारात सापळा रचून बाईकवर हनुमंत अंबादास सुद्रिक ( रा. पिंपरी आष्टी) व विजय पंढरीनाथ गाडे ( रा.वाहिरा ) हे आढळून आले. 

पोलिसांनी हनुमंत सुद्रिकला पाठलाग करून पकडले तर विजय गाडे हा फरार झाला. यात आरोपीकडून गांजा, मोटारसायकल, रोख रक्कम असा एकुण ४ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करत आहेत.

 

Web Title: One arrested for selling marijuana in Aashti; 4 lakhs worth of cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.