One and a half lakh burglaries throughout the day | भर दिवसा दीड लाखाची घरफोडी

भर दिवसा दीड लाखाची घरफोडी

अंबाजोगाई : तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
सेलूअंबा येथील शेतकरी दयानंद रामकिसन संगापुडे हे बुधवारी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दुपारी १ ते ६ वाजताच्या कालावधीत कधीतरी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट उचकून आतील ४५ हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी, गंठन, कानफुले, झुंबर आदी १ लाख रुपये किमितीचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी संगापुडे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना कुलूप तुटल्याचे दिसल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी दयानंद संगापुडे यांच्या फियार्दीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे करत आहेत.

Web Title: One and a half lakh burglaries throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.