केजच्या आठवडी बाजारात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:27 IST2018-05-22T18:27:07+5:302018-05-22T18:27:07+5:30

धारूर येथून आठवडी बाजारासाठी आलेल्या एका वृद्धाचा आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान उष्माघाताने मृत्यू झाला.

Old mans deaths due to sun stroke at kaij weekly bazaar | केजच्या आठवडी बाजारात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू 

केजच्या आठवडी बाजारात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू 

केज (बीड) : धारूर येथून आठवडी बाजारासाठी आलेल्या एका वृद्धाचा आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान उष्माघाताने मृत्यू झाला. बापुराव साहेबराव लांब (६५ ) असे वृद्धाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, धारुर तालुक्यातील चिंचपूर येथील बापुराव साहेबराव लांब हे आठवडी बाजारासाठी येथे आले होते. दुपारी तापमानात मोठी वाढ झाल्याने बाजारहाट करणाऱ्या लांब यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे ते मंगळवार पेठेतील रस्त्याच्या जवळच असलेल्या दुकानाजवळ सावलीत बसले. येथेच त्यांचा बसल्या जागीच मृत्यू झाला. लांब यांच्यासोबत कोणी नसल्याने त्यांचा मृतदेह बराच वेळ तेथेच पडून होता. काही वेळानंतर लांब यांच्या नातेवाईकांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
लांब यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत त्यांच्या गावी नेला. दरम्यान, लांब यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या यावेळी चोरी झाल्याच्या आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
 

Web Title: Old mans deaths due to sun stroke at kaij weekly bazaar