शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:27 AM

बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व्यक्तीने ‘पेठबीड भागात एका व्यक्तीस मुले पळवून घेऊन जाताना रंगेहाथ पकडले’, ...

ठळक मुद्देखात्री न करता पोस्ट फॉरवर्ड करणे अंगलट

बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व्यक्तीने ‘पेठबीड भागात एका व्यक्तीस मुले पळवून घेऊन जाताना रंगेहाथ पकडले’, अशी अफवा पसरविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हेच त्याच्या अंगलट आले असून पेठबीड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अफवा रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पाऊले उचलली जात असून बीडमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी खात्री न करता आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करताना विचार करण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध अफवा पसरविल्या जात आहेत. यामुळे अनेक निरापराध व्यक्तींना मारहाण होत आहे.

औरंगाबाद, परभणी, जालना येथे मारहाण झाल्यानंतर बीड, परळी व माजलगावमध्ये चोर समजून पाच जणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी पत्रक काढून या सर्व अफवा असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता संशयीत व्यक्ती आढळल्यास त्याला मारहाण न करता जवळील पोलिसांच्या स्वाधीन करा. कसलीच खात्री न करता एखाद्याला मारहाण होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे माजलगावमध्ये जवळपास १० लोकांवर गुन्हेही दाखल झाले होते.

एवढे करूनही नागरिकांमध्ये अद्याप पुरेसा बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरून फिरणाºया अफवा काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या अफवा थांबवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.आतापर्यंत ७ लोकांना मारहाणमाजलगाव, परळी, गेवराई व बीडमध्ये आतापर्यंत ७ निरापराध लोकांना नागरिकांनी चोर समजून मारहाण केली आहे. शुक्रवारी दुपारी मांजरसुंबा येथील एका भंगार वेचणाºया इसमास पेठबीड भागात जबर मारहाण करून पोलीस ठाण्यात आणले. याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाल्याने भीती निर्माण झाली आहे.

गावागावात लावले फलकया अफवा असून यावर विश्वास ठेवू नका. कोणालाही मारहाण करू नका. संशयितांना पोलिसांच्या ताब्यात द्या अशा सूचना देऊन त्याखाली संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि बीट अंमलदारांचा मोबाईल क्रमांक टाकून गावागावात फलक लावले आहेत. असे असले तरी अफवांना आळा बसेना झाला आहे. तसेच आता गावात जाऊन दवंडीही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुखांनी केले आहे. 

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडाSocial Mediaसोशल मीडिया