अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:59 PM2019-02-04T23:59:44+5:302019-02-05T00:00:21+5:30

परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील परिचारिकांनी बाह्यरुग्ण कक्षासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

Nurse demonstrations in Ambajogai | अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने

अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने

Next
ठळक मुद्देप्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बाह्यरुग्ण कक्षासमोर जोरदार घोषणाबाजीत केले आंदोलन

अंबाजोगाई : परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील परिचारिकांनी बाह्यरुग्ण कक्षासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
परिचारिकांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे तात्काळ भरावीत, बदली धोरणातून परिचारिकांना वगळावे, कामावर सुरक्षा द्यावी, संघटनेच्या कार्यकर्त्यांचा छळ बंद करावा आदी मागण्या मांडल्या. तसेच परिचारिकांना रुग्णसेवेच्या व्यतिरिक्त अन्य काम देऊ नये, सर्व परिचारिकांचे सेवापुस्तक व्यवस्थित करावे, इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या प्रमाणकानुसार पदे निर्माण करून ती भरावीत, बायोमॅट्रीक प्रणालीमुळे कामावर येऊनही गैरहजेरी मार्क होतो, याची दक्षता घ्यावी, इव्हिनिंग व नाईट सुपर यांना स्वतंत्र खोलीची व्यवस्था व सुरक्षा रक्षक देण्यात यावा, नियमानुसार सर्व परिचारिकांना स्थायित्व प्रमाणपत्र द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य परिचारिका सेवासंघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात अध्यक्षा वर्षा सौताडेकर, उपाध्यक्ष मंगेश सुरवसे, मंगल जावळे, रागिनी पवार, रामराव फड, आशा पौळ, वीरेंद्र चव्हाण, नूरजहाँ काझी, पार्वती जोगदंड, मीरा जाधव, शारदा गित्ते, महानंदा सरवदे, छाया गायकवाड, उल्का शेकटकर, नीता घोडके, राम कुºहाडे, नितीन मोराळेसह परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Nurse demonstrations in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.