आता संघर्ष बस्स झाला, भगवान बाबा पुढचा मार्ग निश्चित सुखकर करतील: प्रीतम मुंडे

By अनिल लगड | Published: October 5, 2022 02:08 PM2022-10-05T14:08:09+5:302022-10-05T14:08:39+5:30

तुमची ऊर्जा, प्रेम हीच आमची ताकद आहे

Now the struggle is over, Bhagwan Baba will make the next path sure and smooth: Pritam Munde | आता संघर्ष बस्स झाला, भगवान बाबा पुढचा मार्ग निश्चित सुखकर करतील: प्रीतम मुंडे

आता संघर्ष बस्स झाला, भगवान बाबा पुढचा मार्ग निश्चित सुखकर करतील: प्रीतम मुंडे

googlenewsNext

सावरगाव घाट ( बीड): लोकांचे प्रेम जबाबदारीची जाणीव करून देते. सर्वांच्या  एकजुटीची ही साक्ष आहे. तुमची ऊर्जा, प्रेम ही आमची ताकद आहे. आता संघर्ष बस्स झाला, भगवान बाबा नक्कीच पुढचा मार्ग सुखकर करतील, अशा भावना खासदार प्रीतम मुंडे यांनी आज व्यक्त केल्या. त्या भगवान भक्तीगड येथील मेळाव्यात बोलत होत्या.

पंकजा मुंडे संघर्ष करो या घोषणा आता बस्स झाले, आता पंकजा ताई तुम आगे बढो..अशी घोषणा द्या...तुमची ऊर्जा, प्रेम ही आमची ताकद आहे. आमच्या मेळाव्याचे हे वेगळेपण आहे. लोकांची लोकाची ताकद आहे. त्यांना भाकरी, निमंत्रण लागत नाही. त्यांना लागते ती फक्त ऊर्जा, भगवान बाबांचे विचार या मेळव्यातून जावेत. ही अपेक्षा, असेही प्रीतम मुंडे यावेळी म्हणाल्या.

प्रीतम मुंडेंच्या रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत
परंपरेप्रमाणे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड येथून भगवान भक्तीगडाकडे आज सकाळी रॅली निघाली. रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. समर्थकांनी मोठे हार देऊन त्यांचे स्वागत केले. तर काही ठिकाणी रॅली मार्ग आणि खा. मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. 

Web Title: Now the struggle is over, Bhagwan Baba will make the next path sure and smooth: Pritam Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.