Now, if the session to file a case comes to me .., Pankaja Munde's anger about dussehara melava savargaon ghat | आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.., पंकजा मुंडेंचा संताप

आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.., पंकजा मुंडेंचा संताप

ठळक मुद्देजिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा  हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती.

बीड - जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मेळावा घेतल्याबद्दल माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह तीन आमदार, खासदार व इतर ५० अशा एकूण ५५ जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन संताप व्यक्त केला आहे. पंकजा यांनी सावरगाव घाट येथे काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेतला. यावेळी, विविध मुद्द्यांवर भाष्य करताना, पालकमंत्री धनंजय मुंडेंवरही अप्रत्यक्षपणे टीका केली होती. मात्र, या मेळाव्यानंतर त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा 
हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही मुंडे समर्थकांनी तेथे गर्दी केली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री आ. महादेव जानकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर ‌व इतर ५० जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन नीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

सावरगाव येथील दसरा मेळाव्यात सोशल डिस्टन्स पाळले नाही, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आणि जमावबंदी असतानाही माणसांची गर्दी जमा केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर... असे म्हणत पंकजा यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, पाहणी दौऱ्यावेळी अनेक नेत्यांनी जिल्ह्यात दौरे केले, त्यांच्यावर कुठलिही कारवाई नसल्याचे सूचवत, आपण परवानगी घेऊन मेळाव्याला गेल्यावरही गुन्हा दाखल केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.  

Web Title: Now, if the session to file a case comes to me .., Pankaja Munde's anger about dussehara melava savargaon ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.