नो मास्क नो एंट्री सक्तीची करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:05+5:302021-03-21T04:32:05+5:30

कमी दाबाने वीजपुरवठा बीड : तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीज पुरवठा ...

No mask no entry should be made compulsory | नो मास्क नो एंट्री सक्तीची करावी

नो मास्क नो एंट्री सक्तीची करावी

कमी दाबाने वीजपुरवठा

बीड : तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीज पुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणने ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करून पूर्ण क्षमतेने व मोठ्या दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला तर सिंचनाची गैरसोय दूर होईल.

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा

अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक, प्रशांत नगर, शिवाजी चौक या भागात असणाऱ्या चहाच्या टपऱ्यांसमोर चहा पिण्यासाठी आलेले ग्राहक आपल्या दुचाकी गाड्या बिनधास्त रस्त्यावर लावून चहा पित बसतात. गाड्या रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. बेशिस्त पार्किंग, समोर असणारे हातगाडे यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

Web Title: No mask no entry should be made compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.