शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधा : आपले पैसे रोखता येतील, काहींना पैसे परत मिळाले लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ...

तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधा : आपले पैसे रोखता येतील, काहींना पैसे परत मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : पैसे काढण्यासाठी आणि एकमेकांना पाठविण्यासाठी, तसेच अनेक व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत. ही पद्धत चांगली आहे. मात्र, याचा दुरुपयोग करीत काही ठग आर्थिक फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे लोक संबंधित व्यक्तीला ना कॉल करतात, ना ओटीपी मागतात. तरी बँकेतून पैसे गायब होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जात आहे.

मोबाइलचा वापर वाढला. त्याचबरोबर ऑनलाइन व्यवहारदेखील वाढले आहेत. त्यासाठी विविध प्रकारचे ॲप वापरले जातात. त्यामधूनदेखील फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बऱ्याच वेळा ॲपशी संबंधित बोलायचे आहे असे सांगून फसवणूक केली जाते. एकाच खात्यातून अनेकवेळा पैसे काढले जातात. दरम्यान, अशा प्रकारे ओटीपी न सांगता किंवा कॉलवर न बोलता देखील पैसे गायब झाले असतील, तर त्याची हमी ही बँकेची असते. अशा ग्राहकांना ते पैसे बँकेकडून परत खात्यावर जमा केले जातात. त्यासाठी असा प्रकार घडल्यानंतर तत्काळ सायबर सेलकडे तक्रार करणे गरजेचे आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करून संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जातो. दरम्यान, आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतही माहिती कॉलवर देणे टाळा. जेणेकरून फसवणूक होणार नाही, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

पूर्वी हॅकरकडून २४ तासांत पैसे परत मिळविले जात होते. मात्र, या काळात हॅकर्सने कामाची पद्धत बदलली आहे. जर आपल्या खात्यातून पैसे चोरीला गेले असतील, तर याची तक्रार सायबर सेलकडे करावी. त्यामुळे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. बहुतांश ठिकाणी या प्रकरणांमधील पैसे परत मिळतात.

फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. बँक खात्याशी संबंधित माहिती उघड केल्यानंतर फसवणूक झाल्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. या परिस्थितीमध्ये तत्काळ सायबर सेलकडे तक्रार करणे गरजेचे आहे. जेणेकरून गेलेले पैसे परत ग्राहकास मिळतील. अनोळखी ॲप नकोच

अनेकवेळा मोफत गाणे डाऊनलोड करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्याच्या अनेक सूचना स्मार्ट फोनवर वेळोवेळी दिसून येतात. अशावेळी हे ॲप डाऊनलोड करण्याची आपली इच्छा होते. मात्र, असे ॲप डाऊनलोड करताना विचार करणे गरजेचे आहे.

वस्तू महागडी असतानाही काही कंपन्या स्वस्त दरात आपली वस्तू असल्याचा दावा करतात. अशावेळी ग्राहकांनी सावध राहणे आवश्यक आहे.

ऑनलाइन व्यवहार करतानादेखील फसवणूक केली जात आहे. त्यामुळे सर्व खात्री करूनच संपूर्ण व्यवहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे होणारी फसवणूक टाळता येणार आहे. ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे २०२० ३९ २०२१ ७६ ७२५७५ रुपये अशा गुन्ह्यातील सायबर सेलकडून करण्यात आले परत ....

सायबर सेल अधिकारी म्हणतात.... ग्राहकांनी स्मार्ट फोन वापरताना व पैशाचे व्यवहार करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रलोभने दाखविले जाते. त्याला बळी पडू नये. बँक खात्यासंदर्भात माहिती कोणाला देऊ नका. सतर्कता बाळगून व्यवहार करा.

-आर. एस. गायकवाड, सायबर सेलप्रमुख