भरधाव टेम्पोच्या धडकेत माय-लेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:18 IST2018-12-19T00:18:31+5:302018-12-19T00:18:54+5:30
केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वरांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मायलेकावर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उत्रेश्वर पिंपरी चौफळ्यावर घडला. मयत हे कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील रहिवाशी आहेत.

भरधाव टेम्पोच्या धडकेत माय-लेक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वरांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मायलेकावर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उत्रेश्वर पिंपरी चौफळ्यावर घडला. मयत हे कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील रहिवाशी आहेत.
श्रीकांत (२३) व भागीरथीबाई मच्छिंद्र कवडे (४७) असे मयत मायलेकाचे नाव आहे. श्रीकांत व त्याची आई हे दोघे दुचाकीवरून (एमएच २५ एजी ४५४०) केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते सायंकाळच्या सुमारास गावाकडे परतले. उत्रेश्वर पिंपरीपासून २ किमी अंतरावर असलेल्या चौफळ्यावर आले असता कापूस घेऊन जाणाºया भरधाव टेम्पोने (एमएच १० - के ७७६६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी टेम्पोच्या टायरखाली आली. त्यामुळे दोघेही तब्बल ३५ पेक्षा जास्त फुटापर्यंत फरफटत गेले. यात दोघेही जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच केजचे फौजदार सुरेश माळी, जमादार जाधव, अमोल गायकवाड, अण्णासाहेब राठोड, सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.