महामार्गासाठी मुरूम नेला, शेतकऱ्यांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST2021-03-28T04:31:13+5:302021-03-28T04:31:13+5:30

धारुर : तालुक्यातून गेलेल्या खामगाव -पंढरपूर या महामार्गाच्या कामासाठी तालुक्यातील गांवदरा व आंबेवडगाव येथील शेतकऱ्यांना भूलथापा देत ...

Murum took to the highway, slapping the farmers | महामार्गासाठी मुरूम नेला, शेतकऱ्यांना ठेंगा

महामार्गासाठी मुरूम नेला, शेतकऱ्यांना ठेंगा

धारुर : तालुक्यातून गेलेल्या खामगाव -पंढरपूर या महामार्गाच्या कामासाठी तालुक्यातील गांवदरा व आंबेवडगाव येथील शेतकऱ्यांना भूलथापा देत त्यांच्या शेतीतील मुरुम संबंधित एजन्सीने नेला, मात्र त्यांना भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी शंकर दराडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. या मागणीसाठी अमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

धारुर तालुक्यातून खामगाव -पढंरपूर या महामार्गाचे काम करण्यात आलेले आहे. काम करताना संबंधित कंपनीने मनमानी काम केलेले आहे. त्याच बरोबर गांवदरा -आंबेवडगाव भागातील काही शेतकऱ्यांना भूलथापा देत त्याच्या मालकीच्या जमिनीतील डोंगर पोखरुन मुरुम नेला, मात्र शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची मदत केलेली नाही. तसेच आंबेवडगाव येथील शेतकऱ्यांच्या रस्त्यालगतच्या जमिनीतील मुरूम नेण्यात आला. हा मुरूम नेताना, ‘तुमची जमीन पार्किंगसाठी संपादित करू, तुम्हाला शासनामार्फत मोबदला दिला जाईल’, असे सांगत बोळवण केली. मात्र अद्यापही रामहारी नायकोडे, मसू वाघमोडे ,इंदर नायकोडे व इतर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. या शेतकऱ्यांनी मोबदल्यासाठी मागणी केली तर तुमची जमीन आम्हाला नको असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे खोदलेली जमीन तरी भरून द्या नसता संपादित तर करून घ्यावी, अशी मागणी इंदर नायकोडे , मसू वाघमोडे यांनी केली आहे. तसेच गांवदरा येथील रहिवासी शंकर दराडे यांची जमीन कारी, गांवदरा भागात आहे. काही लोकांनी दराडे यांना तुमच्या जागेतील मुरुम या कामासाठी द्या, तुम्हाला फायदा होईल. मोबदला मिळेल, असे सांगून तेथून मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा करून तर नेला. त्यामुळे शंकर दराडे,निवृती दराडे, भिमा भांगे, रामभाऊ वावळकर या शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी तहसीलसमोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

===Photopath===

270321\anil mhajan_img-20210326-wa0068_14.jpg

Web Title: Murum took to the highway, slapping the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.