शहाजनपूर खून प्रकरणात ‘त्या’ प्रियकराला तीन दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 19:02 IST2018-12-14T19:02:22+5:302018-12-14T19:02:54+5:30
या प्रकरणातील मुख्य आरोपी मयताची पत्नी ही अद्यापही फरार असून तिच्या मागावर माजलगाव ग्रामीण पोलीस आहेत.
_201707279.jpg)
शहाजनपूर खून प्रकरणात ‘त्या’ प्रियकराला तीन दिवस पोलीस कोठडी
माजलगाव (बीड ) : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून केल्याची घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील शहाजानपूर येथे घडली होती. यातील प्रियकराला तात्काळ ताब्यात घेतले होते. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी मयताची पत्नी ही अद्यापही फरार असून तिच्या मागावर माजलगाव ग्रामीण पोलीस आहेत.
बालासाहेब शिंदे (वय ४० वर्षे, रा. शहाजानपूर, ता. माजलगाव) यांचा पत्नी कावेरी शिंदे हेने प्रियकर विठ्ठल आगेच्या मदतीने गळा आवळून खून केला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल होताच ग्रामीण ठाण्याचे पोउपनि विकास दांडे यांनी तपास गतीने करून विठ्ठल बेड्या ठोकल्या. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, यातील आरोपी असलेली कावेरीने घटना घडताच पळ काढला होता. अद्यापही ती फरार सअून तिच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे पोउपनि दांडे यांनी सांगितले. उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विकास दांडे यांनी अपघात भासविण्याचा प्रयत्न हानून पाडला आणि हा घातपात असल्याचे तपास करून सिद्ध केले.