मुंडे, सोनवणे आज उमेदवारी दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:31 IST2019-03-25T00:30:41+5:302019-03-25T00:31:30+5:30
बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २५ मार्च रोजी भाजप, शिवसेना, रिपाइं व रासप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे या उमेदवारी दाखल करणार आहेत.

मुंडे, सोनवणे आज उमेदवारी दाखल करणार
बीड : बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २५ मार्च रोजी भाजप, शिवसेना, रिपाइं व रासप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे या उमेदवारी दाखल करणार आहेत. दुपारी २ वा. पालकमंत्री पंकजा मुंडे, महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह अर्ज दाखल केल्यानंतर ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली काढण्यात येणार आहे. नगर रोडवरील माने कॉम्पलेक्सजवळच्या मैदानावर सभेने रॅलीचा समारोप होणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस (आय), स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी (कवाडे गट), रिपाइं (गवई गट), मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी १० वाजता काढण्यात येणाऱ्या रॅलीत जिल्ह्यातील महाआघाडीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.