परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:17 IST2019-01-13T00:14:53+5:302019-01-13T00:17:05+5:30

हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या त्रिंबक विठ्ठल राठोड (धारावती तांडा ता.परळी) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली. शनिवारी त्यास स्थानबद्ध करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविले आहे.

MPDA proceedings at Parli handicraft liquor vendor | परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई

परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या त्रिंबक विठ्ठल राठोड (धारावती तांडा ता.परळी) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली. शनिवारी त्यास स्थानबद्ध करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविले आहे.
त्रिंबकही परळी तालुक्यात सर्रास हातभट्टी दारू तयार करून तो विक्री करायचा. तसेच त्याचा व्यापारही करायचा. त्याच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. वारंवार कारवाईनंतरही त्याच्यात सुधारणा झाली नाही. हाच धागा पकडून पो.नि. सुरेश चाटे यांनी त्रिंबकचा प्रस्ताव तयार केला. अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत तो जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्याकडे पाठविला. त्यांनी चौकशी करून त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे त्याला शनिवारी स्थानबद्ध केले आणि त्याची बंदोबस्तात हर्सूल कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड, गुन्हे शाखेचे पो.नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुरेश चाटे, सपोनि मारोती शेळके, पोउपनि कांबळे, आडे व पथकाने केली.

Web Title: MPDA proceedings at Parli handicraft liquor vendor