माजलगावात मराठा आरक्षणासाठी युवकांचे गोदावरी नदी पात्रात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 15:33 IST2018-07-27T15:33:00+5:302018-07-27T15:33:29+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुरुषोत्तमपुरी येथे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास युवकांनी गोदावरी नदी पात्रात उतरून आंदोलन केले.

माजलगावात मराठा आरक्षणासाठी युवकांचे गोदावरी नदी पात्रात आंदोलन
माजलगाव (बीड ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुरुषोत्तमपुरी येथे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास युवकांनी गोदावरी नदी पात्रात उतरून आंदोलन केले. यावेळी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून उपया योजना करण्यात आली होती.
मराठा आरक्षणाचा वणवा आता गावोगावी पोहचत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत. तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आज सकाळी गोदावरी नदीपात्रात उतरत आंदोलकांनी 'जल आंदोलन' केले. तासभर चालेल्या या आंदोलनात सरकार विरोधात जीरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलना वेळी प्रशासनाकडून योग्य ती उपाय योजना करण्यात आली होती.