बीड शहरात ‘मडबाथ’चा वाढतोय कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:42 IST2018-11-22T00:41:35+5:302018-11-22T00:42:10+5:30
मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं ही प्रेरणा देणारी उक्ती सर्वश्रुत आहे. धकाधकीच्या जीवनात भौतिक सुखाचा आनंद घेणारे मातीपासून दूर जात आहेत. मात्र अलिकडच्या काळात निसर्गोपचाराचे महत्व पटू लागल्याने मडबाथचा ट्रेंड बीड परिसरात वाढू लागला आहे. शरीरशुद्धीसाठी निसर्गरम्य ठिकाणी नियोजन करत मडबाथचा आनंद निसर्गप्रेमींनी लुटला.

बीड शहरात ‘मडबाथ’चा वाढतोय कल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं ही प्रेरणा देणारी उक्ती सर्वश्रुत आहे. धकाधकीच्या जीवनात भौतिक सुखाचा आनंद घेणारे मातीपासून दूर जात आहेत. मात्र अलिकडच्या काळात निसर्गोपचाराचे महत्व पटू लागल्याने मडबाथचा ट्रेंड बीड परिसरात वाढू लागला आहे. शरीरशुद्धीसाठी निसर्गरम्य ठिकाणी नियोजन करत मडबाथचा आनंद निसर्गप्रेमींनी लुटला.
आयुष्यभर निरोगी राहण्याचा राजमार्ग म्हणून निसर्ग उपचार मानला जातो. राष्टÑीय निसर्गोपचार दिनाचे आचित्य साधून मातीस्नानाचा आगळावेगळा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. बीडपासून जवळच बिंदूसरा प्रकल्पाजवळ हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी महिला, पुरूष, अबालवृद्ध, व्याधीग्रस्त व आजारी व्यक्ती उपस्थित होते. यावेळी योग व निसर्गोपचार तज्ज्ञ विनायक वझे, आयुषचे आनंदकुमार लिमकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. भारतीय प्राकृतिक चिकित्सा, माती लेप व माती स्नानाचे फायदे वझे यांनी पटवून दिले.
मडथेरेपी करताना सांगण्यात आले आयुर्वेदाचे महत्व
शेतातील चार फूट खोलपर्यंतची तसेच विविध नदी पात्रातील माती आणून यात मुल्तानी माती, चंदन पावडर, लिंबाचा अर्क असे मिश्रण तयार करण्यात आले. ते पाण्यात भिजवून अंगभर लेप लावण्यात आला.
रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीनेही क्लबच्या सदस्यांसाठी मडबाथचा उप्रकम राबविण्यात आला. श्रीक्षेत्र कपिलधार परिसरातील निसर्गरम्य वातावरणात मडथेरेपी करण्यात आली. प्राकृतिक चिकित्सा शोध, संशोधन, प्रसार अभियानांतर्गत गंगाजल रथयात्रा काढण्यात आली होती. यात अनेकांनी नोंदणी करुन मडथेरेपीचा आनंद लुटला.