Molestation of a woman coming from the farm; The victim was beaten by the wives of the accused | शेतातून येणाऱ्या महिलेचा विनयभंग; वाच्यता होताच आरोपींच्या पत्नींकडून पिडीतेला केली मारहाण

शेतातून येणाऱ्या महिलेचा विनयभंग; वाच्यता होताच आरोपींच्या पत्नींकडून पिडीतेला केली मारहाण

ठळक मुद्देपिडीतेचा आरडाओरडा ऐकून आजबाजूच्या शेतातील ग्रामस्थ आलेपिडीतेने घरी येऊन सर्व घटना कुटुंबियांना सांगितली. 

अंबाजोगाई : शेतात जनावरे चारून परतणाऱ्या महिलेस दोघांनी रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्या दोघांच्या पत्नींनी त्या महिलेस बेदम मारहाण केली. अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या या प्रकरणात ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ३५ वर्षीय पीडिता सोमवारी जनावरे चारून सायंकाळी ७ वाजता शेतातून घराकडे निघाली होती. त्या राहत असलेल्या तांड्यावर राहणारे सचिन राजाभाऊ आडे व सुनील राजाभाऊ आडे या दोघांनी तिला रस्त्यात अडविले आणि तिचा विनयभंग केला. यावेळी पिडीतेचा आरडाओरडा ऐकून आजबाजूच्या शेतातील ग्रामस्थ येत असल्याचे पाहून त्या दोघांनी पिडीतेला झाल्या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत पळ काढला. त्यानंतर पिडीतेने घरी येऊन सर्व घटना कुटुंबियांना सांगितली. 

त्यावेळी आरोपींच्या पत्नी रेणुका सचिन आडे आणि चांगुना सुनील आडे या दोघी तिथ आल्या. आमच्या नवऱ्यावर का आळ घेतेस असे म्हणत त्या दोघींनी पिडीतेला बेदम मारहाण केली असे पिडीतेने पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी चारही आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Molestation of a woman coming from the farm; The victim was beaten by the wives of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.