मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:58+5:302021-07-07T04:41:58+5:30

.... ‘ऑनलाइन व्यवहार काळजीपूर्वक करा’ वडवणी : आज घडीला समाज माध्यमातून विविध आकर्षित जाहिराती दिल्या जातात. त्या माध्यमातून आपल्याशी ...

Mokat dogs suffered | मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला

मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला

....

‘ऑनलाइन व्यवहार काळजीपूर्वक करा’

वडवणी : आज घडीला समाज माध्यमातून विविध आकर्षित जाहिराती दिल्या जातात. त्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना स्वत:ची माहिती विचारली जाते. वैयक्तिक माहिती देऊ नये, फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वडवणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी सांगितले.

फसवणूक करण्याच्या नवनवीन पद्धती निघाल्या. आपल्या भ्रमणध्वनीचा सीम कार्ड बंद होत आहे, असा संदेश सांगून फसवणूक करण्याचा प्रकार घडत आहे. ऑफर म्हणून तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाते, असे सांगून बँक खात्याची इत्थंभूत माहिती ओटीपी, क्यूआर कोड पाठवून एसएमएस फाॅरवर्डसारखे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून फसवणूक होऊ शकते. यामुळे वैयक्तिक माहिती देताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन मिरकर यांनी केले आहे.

....

गटारींमुळे डासांचा उपद्रव वाढला

वडवणी : पावसाळ्याला सुरुवात झाली असून वडवणीतील गटारात पाणी साचत आहे. गढूळ पाण्यामुळे डासांचा त्रास वाढत आहे. कोरोनाची भीती दूर झाली असली तरी पावसाळी आजाराची भीती वाढत आहे. डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण वाढू नये, याकरिता गावात डास निर्मूलन मोहीम राबविणे आवश्यक आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Mokat dogs suffered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.