मोबाइल रेंज मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:25+5:302021-03-17T04:34:25+5:30
अवैध प्रवासी वाहतूक अंबाजोगाई : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. जवळपासच्या खेडेगावांना बस वाहतूक सुरू झाली ...

मोबाइल रेंज मिळेना
अवैध प्रवासी वाहतूक
अंबाजोगाई : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. जवळपासच्या खेडेगावांना बस वाहतूक सुरू झाली नसल्याने, अवैध प्रवासी वाहतुकीवरच नागरिकांचा प्रवास सुरू आहे. जास्त प्रवासी बसविल्याने धोका निर्माण झाला आहे.
बाजारकरूंना त्रास
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना, तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून बाजारतळाची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
अस्वच्छतेकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने, स्वच्छतेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. अनेक गावांमध्ये नाल्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने, तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने वाहतूककोंडी होते.