बीडमध्ये मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:01 IST2019-07-08T16:58:53+5:302019-07-08T17:01:37+5:30
या कारवाईमुळे जिल्हाभरातील मोबाईल चोरांची साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलणारी टोळी गजाआड
बीड : जिल्ह्यातील विविध ठिकाणहून मोबाईल चोरी करुन त्यांचे आयएमईआय नंबरमध्ये बदल करुन, विक्री करणाऱ्या टोळीला दरोडा प्रतिबंधक पथकाने माजलगाव शहरातून अटक केली आहे.
दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि. गजानन जाधव यांना खबऱ्यामार्फत विविध ठिकाणाहून मोबाईल चोरुन, सॉप्टवेअरच्या माध्यमातून मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन दरोडा प्रतिबंधक पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी माजलगाव शहरात दोन ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथील चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून जवळपास ६ लाख ७५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी टोळीतील माजलगाव येथील शेख मतीन शेख हानीफ( रा.फुलेनगर) शेख जुबेर शेख ईसाक, शेख मोहसीन शेख इसाक (अशोकनगर) यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरातील मोबाईल चोरांची साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पो.अ.अजित बोºहाडे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गजानन जाधव यांच्यासोबत मुंजाबा सौंदरमल, राजेभाऊ नगरगोजे, मनोज वाघ, अशोक दुबाले, महेश चव्हाण, भारत बंड, राहुल शिंदे यांनी केली.