अमित ठाकरेंच्या दौऱ्याला परळीतून सुरुवात; दिवसभर घेणार कार्यकर्त्यांची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 18:37 IST2022-10-12T18:32:59+5:302022-10-12T18:37:29+5:30
मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.

अमित ठाकरेंच्या दौऱ्याला परळीतून सुरुवात; दिवसभर घेणार कार्यकर्त्यांची आढावा बैठक
मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. परळीतील वैद्यनाथ मंदिरात नतमस्तक होऊन अमित ठाकरेंनी मुंडेंच्या परळीतून या दौऱ्याला सुरुवात केली. आज दिवसभर शासकीय विश्रामगृहात अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असून या बैठकीसाठी मराठवाड्यातून विविध पदाधिकारी हजर होते.
आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे तयार असल्याचं मनसेनेते दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये मनसे आपली राजकीय ताकद वाढवू पाहत आहे. त्यामुळेच अमित ठाकरे यांनी मुंडेंच्या परळीतून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. दरम्यान या ठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.