बेपत्ता विवाहितेचा मृतदेह विहिरीत ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:13 IST2020-01-13T00:12:38+5:302020-01-13T00:13:00+5:30

आष्टी : तालुक्यातील टाकळसिंग येथील एक महिला हरवल्याची तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. महिलेचे नातेवाईक व पोलिस ...

Missing spouse's body well ...! | बेपत्ता विवाहितेचा मृतदेह विहिरीत ...!

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह विहिरीत ...!

आष्टी : तालुक्यातील टाकळसिंग येथील एक महिला हरवल्याची तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. महिलेचे नातेवाईक व पोलिस महिलेचा शोध घेत होते.अखेर चौथ्या दिवशी ११ जानेवारी रोजी सकाळी टाकळसिंग शिवारातील लक्ष्मण दौंड यांच्या विहिरीत संबंधित महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिला ही विवाहित असून तिला एक वर्षाची मुलगी आहे.
तालुक्यातील टाकळसिंग येथील दौंडे वस्ती शिवारातील मयत मनिषा बालाजी दौंडे (वय १९) दि ७ जानेवारी पासून बेपत्ता होती. चार दिवसापासून तिचा शोध सुरु होता. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची तक्रार देखील दाखल होती. शनिवारी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे टाकळसिंग शिवारात राहणारे तिचे चुलते लक्ष्मण दौंडे यांच्या विहिरीमध्ये उडी घेऊन तिने आत्महत्या केली. त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आष्टी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आष्टी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर शनिवारी रात्री टाकळसिंग येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार सोनाजी हंबर्डे, पो ना रघुनाथ आटोळे हे करीत आहेत.

Web Title: Missing spouse's body well ...!